Kiran Mane Joines Shiv Sena Thackeray Camp: अभिनेते किरण माने यांनी हाती बांधलं शिवबंधन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश
सोशल मीडियावर राजकीय भूमिका घेत पोस्ट टाकल्यामुळे अभिनेते किरण माने यांना एका मालिकेतून काढून टाकण्यात आलं होतं. त्यानंतर आता त्यांनी पहिल्यांदाच ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
अभिनेते किरण माने यांनी अखेर हाती शिवबंधन बांधत राजकारणामध्ये प्रवेश केला आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांचा आज (7 डिसेंबर) प्रवेश झाला आहे. मातोश्रीवर त्यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी सुषमा अंधारे, वरूण सरदेसाई उपस्थित होते. ‘एक उत्तम नेतृत्व पक्षाला मिळतंय ह्याचा आनंद आहे‘ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी त्यांचं स्वागत केलं आहे. सोशल मीडियावर राजकीय भूमिका घेत पोस्ट टाकल्यामुळे अभिनेते किरण माने यांना एका मालिकेतून काढून टाकण्यात आलं होतं. त्यानंतर हा मुद्दा खूप गाजला होता. माने यापूर्वी शरद पवारांसोबत जाणार असल्याचीही चर्चा रंगली होती.
पहा पोस्ट
View this post on Instagram
A post shared by ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsena)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)