Katrina Kaif at Shirdi Sai Baba Temple: कतरिना कैफ साई बाबांच्या चरणी; शिर्डीत सासू वीणा कौशल यांच्यासोबतचे दृश्य पहा Watch Video)
बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिने सासू वीणा कौशल यांच्यासोबत सोमवारी, 16 डिसेंबर रोजी शिर्डी येथे साईबाबा मंदिरात साईंचे दर्शन घेतले.
Katrina Kaif at Shirdi Sai Baba Temple: कतरिना कैफ क्वचितच सार्वजनिकरित्या बाहेर दिसते. परंतु जेव्हा ती सार्वजनिक रित्या हजेरी लावते तेव्हा ती हेडलाइन्समध्ये दिसते. सोमवारी 16 डिसेंबर रोजी तिने सासू वीणा कौशल यांच्यासोबत साईबाबा मंदिरात हजेरी(Katrina Kaif Offers Prayers at Shirdi Sai) लावली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, कतरिना कैफ पांढऱ्या कुर्त्यामध्ये अतिशय सुंदर दिसत होती. पारंपारिक पोषाख ती उत्तम प्रकारे हँडल करते हे दिसले. दुसऱ्या व्हिडिओमध्ये, अभिनेत्री मुंबई विमानतळावर सासू वीणा कौशल यांना मिठी मारताना दिसत आहे. कामाच्याबाबतीत बोलायचे झाले तर, कतरिना जी ले जरामध्ये प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्टसोबत दिसणार आहे.
कतरिना कैफ साई बाबांच्या चरणी
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)