Kannada superstar Puneeth Rajkumar Passes Away : कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराने निधन
अभिनेता पुनीत राजकुमार याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे. कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक अशी त्यांची ओळख होती. वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे कन्नड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. रुग्णालयातील डॉक्टरांचे एक पथक त्याच्यावर सतत नजर ठेवून होते. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती खालवत गेली. बंगळुरुमधील विक्रम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. पुनीत राजकुमार यांच्या निधनाबद्दल रुग्णालयाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
#Bengaluru: Popular Kannada actor, Superstar, #PuneethRajkumar (46), son of Kannada cinema legend Dr Rajkumar is no more. He succumbed to heart attack at Vikram hospital following chest pain. pic.twitter.com/DTE08D3yOW
— IANS Tweets (@ians_india) October 29, 2021
BREAKING :
High alert declared in #Karnataka . Police battalions deployed. Govt ordered to close theatres immediately. #PuneethRajKumar #Bangalore
— T2BLive.COM (@T2BLive) October 29, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 29, 2021 02:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

