इन्स्टाग्राम स्टार 'फैजल शेखला' केली पाोलिसांनी अटक, बघा काय आहे प्रकरण

फैजल शेख ऊर्फ फैजू याने एका सोसायटीच्या गेटला भरधाव वेगात गाडी धडकवून अपघात केला आहे.

(Photo Credit - Instagram)

टिकटॉक (Tik tock) आणि इन्स्टग्रामचा(  Instagram) स्टार असलेला फैजल शेख (Faisal Shaikh) याला पोलिसांनी अटक केली आहे. काल त्याच्या सहकाऱ्यांसह ओशिवरा येथील मिलत नगर विभागात त्याच्या बीएमडब्लू कारने आला होता. मात्र भरधाव वेगात त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याची गाडी इथल्या अल तबुत या सोसायटीच्या गेटला धडक देऊन या सोसायटी मध्ये घुसली. सुदैवाने या ठिकाणी कोणी व्यक्ती त्या वेळी नसल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र सोसायटीचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी फैजूच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement