Indian Police Force Teaser: 'इंडियन पोलिस फोर्स' सीरिजचा टीझर रिलीज, जानेवारीत होणार प्रदर्शित

'इंडियन पोलिस फोर्स' ही मालिका रोहित शेट्टीने दिग्दर्शित केली आहे आणि त्यात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय हे कलाकार झळकणार आहेत.

Indian Police Force

Indian Police Force Teaser: 'इंडियन पोलिस फोर्स' ही मालिका रोहित शेट्टीने दिग्दर्शित केली आहे आणि त्यात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय हे कलाकार झळकणार आहेत. ही मालिका १९ जानेवारीमध्ये प्रदर्शित होणार आहे. 240 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्राइम व्हिडिओवर ही मालिका पाहायला मिळणार आहे. सिध्दार्थ मल्होत्रा या मालिकेत अॅक्शन भुमिकेत झळकणार आहे. चाहत्यांना त्याची आतुरता लागली आहे.   मालिकेतील कलाकारांचा लूक रिलीज झाल्यापासून चाहते त्याच्या टीझरची वाट पाहत होते. आता निर्मात्यांनी रसिकांची उत्सुकता गगनाला भिडलेल्या या मालिकेचा टीझरही रिलीज केला आहे. या मालिकेत रोहित शेट्टी, सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय अॅक्शन अवतारात दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement