Robbie Coltrane Passes Away: 'हॅरी पॉटर' चित्रपटात 'हॅग्रिड'ची भूमिका साकारणारे रॉबी कोल्ट्रेन यांचे निधन

अभिनेता आणि कॉमिक रॉबी कोल्ट्रेन यांचे निधन झाले आहे. त्यांची एजन्सी WME ने हॉलिवूड रिपोर्टरला याबाबत माहिती दिली.

Robbie Coltrane (संग्रहित संपादित प्रतिमा)

हॅरी पॉटर मूव्ही फ्रँचायझीमध्ये हॅग्रिडची भूमिका साकारणारे तसेच क्रॅकर या ब्रिटीश गुन्हेगारी मालिकेतील अभिनेता आणि कॉमिक रॉबी कोल्ट्रेन यांचे निधन झाले आहे. त्यांची एजन्सी WME ने हॉलिवूड रिपोर्टरला याबाबत माहिती दिली. रॉबी 72 वर्षांचे होते. कोल्ट्रेन यांचा जन्म 30 मार्च 1950 रोजी ग्लासगो, स्कॉटलंड येथे झाला. ग्लासगो आर्ट स्कूलमधून पदवी घेतल्यानंतर, त्यांनी एडिनबर्गमधील मोरे हाऊस कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये कला विषयाचा अभ्यास सुरू ठेवला. पुढे कॉमेडी आणि थिएटरमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या या कलाकाराने जेम्स बाँडच्या दोन चित्रपटांमध्ये काम केले. त्यांना 'हॅरी पॉटर' चित्रपटातील 'हॅग्रिड'च्या भूमिकेने विशेष प्रसिद्धी मिळवून दिली. हॅग्रिड हे पात्र हॅरी पॉटर फ्रँचायझीच्या सर्व चित्रपटामधील एक महत्वाचे पात्र होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement