Ed Sheeran’s Bengaluru Street Performance: बेंगळुरूमध्ये फुटपाथवर गात असलेल्या गायक 'एड शीरन'चा परफॉर्मन्स पोलिसांनी मधेच थांबवला; निघून जाण्यास सांगितले, व्हिडीओ व्हायरल (Watch)

इतक्या मोठ्या गायकाला असे गाताना पाहून, काही वेळातच चाहत्यांची गर्दी तिथे जमू लागली. यानंतर, बेंगळुरू पोलिसही काही वेळातच तिथे पोहोचले. त्यांना नक्की कोण गात आहे हे माहित नसल्याने त्यांनी गायकाचा माइक आणि गिटार काढून घेतला आणि त्याला येथून निघून जाण्यास सांगितले.

Ed Sheeran (Photo Credits: Instagram)

ब्रिटनचा प्रसिद्ध गायक एड शीरन सध्या भारतात आहेत. अलिकडेच तो चेन्नईमध्ये ए.आर. रहमानसोबत स्टेजवर गाताना दिसला होता. त्यानंतर ग्रॅमी पुरस्कार विजेते एड शीरन रविवारी बेंगळुरूला पोहोचले. मात्र बेंगळुरूमध्ये एड शीरनसोबत एक घटना घडली, जी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तर रविवारी सकाळी एड शीरन बेंगळुरूमध्ये रस्त्याच्या कडेला माइक आणि गिटार घेऊन आला आणि गाणे सुरू केले. इतक्या मोठ्या गायकाला असे गाताना पाहून, काही वेळातच चाहत्यांची गर्दी तिथे जमू लागली. यानंतर, बेंगळुरू पोलिसही काही वेळातच तिथे पोहोचले. त्यांना नक्की कोण गात आहे हे माहित नसल्याने त्यांनी गायकाचा माइक आणि गिटार काढून घेतला आणि त्याला येथून निघून जाण्यास सांगितले. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. एड शीरन बेंगळुरूमधील चर्च स्ट्रीटवर गात असताना त्याला पोलिसांनी थांबवले. एड शीरनला येथे कोणत्याही प्रकारचा संगीत कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी नसल्याचे सांगण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून, चर्च स्ट्रीटवरील फूटपाथवर अशा प्रकारच्या प्रदर्शनांमुळे लोकांना होणाऱ्या गैरसोयींबद्दल अनेक तक्रारी आल्या आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की, फूटपाथवर अचानक सादरीकरण करणे नियमांच्या विरुद्ध आहे. म्हणूनच ही कारवाई करण्यात आली. (हेही वाचा: Grammy Awards 2025: भारतीय-अमेरिकन संगीतकार Chandrika Tandon यांना 'त्रिवेणी' अल्बमसाठी प्राप्त झाला प्रतिष्ठित ग्रॅमी पुरस्कार)

Ed Sheeran’s Bengaluru Street Performance: 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now