Amol Kolhe On Free Pass: मोफत तिकीट मागणाऱ्यांना अमोल कोल्हेंची कळकळीची विनंती, महानाट्या नंतर व्हिडिओ शेअर करत केली ही मागणी

अमोल कोल्हे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस दलातील काही पोलीस कर्मचाऱ्यांनी मोफत तिकीट दिलं नाही म्हणून नाटक कसं होतं बघतो अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Amol Kolhe

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस दलातील काही पोलीस कर्मचाऱ्यांनी मोफत तिकीट दिलं नाही म्हणून नाटक कसं होतं बघतो अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. छत्रपती संभाजी महाराजांवरील महानाट्याचा प्रयोग झाल्यानंतर त्यांनी स्वतः प्रेक्षकांसमोर येत ही घटना सांगितली. तसेच याचे व्हिडीओ ट्वीट करत माहिती दिली."आज पिंपरी चिंचवडमध्ये अत्यंत खेदजनक अनुभव आला आहे. मी त्या पोलीस बांधवांचं नाव सांगणार नाही. कारण विरोध व्यक्तीला नाही, विरोध प्रवृत्तीला आहे. ही प्रवृत्ती नाटकाचे मोफत तिकिट मागण्याची आहे." असे त्यांनी म्हटले.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement