CSpace OTT Platform: केरळमध्ये सुरु झाला भारतातील पहिला सरकारी ओटीटी प्लॅटफॉर्म; दाखवले जाणार फक्त मल्याळम सिनेमे

सी-स्पेसच्या माध्यमातून राज्याची संस्कृती ही केरळ राज्याव्यतिरिक्त जगभरात पसरलेल्या 64 लाख मल्याळी लोकांपर्यंत पोहोचेल. यावर सुरुवातीला 42 राष्ट्रीय पुरस्कार चित्रपट पाहण्यास उपलब्ध असतील.

Television | Representational image (Photo Credits: pixabay)

Country’s First Government-Backed OTT: स्वस्त सरकारी इंटरनेटनंतर आता केरळ सरकारने स्वतःचे ओटीटी प्लॅटफॉर्म गुरुवारी सुरू केले. हे देशातील पहिले सरकारी ओटीटी असेल. तीन वर्षांत तयार झालेल्या या प्लॅटफॉर्मचे नाव 'सी-स्पेस' (CSpace) आहे. या प्लॅटफॉर्म तयार करणारे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते शाजी एन. करुण यांनी दैनिक भास्करला सांगितले की, सी-स्पेसच्या माध्यमातून राज्याची संस्कृती ही केरळ राज्याव्यतिरिक्त जगभरात पसरलेल्या 64 लाख मल्याळी लोकांपर्यंत पोहोचेल. यावर सुरुवातीला 42 राष्ट्रीय पुरस्कार चित्रपट पाहण्यास उपलब्ध असतील. सी-स्पेस ३ महिन्यांसाठी मोफत असेल. यानंतर, ते 'पे पर व्ह्यू म्हणजेच PPV' मॉडेलवर चालेल, ज्यामध्ये प्रत्येक चित्रपटाचे भाडे 75 रुपये असेल. या व्यासपीठावर फक्त मल्याळम सिनेमे दाखवले जाणार आहेत. चित्रपट निर्माते आणि प्लॅटफॉर्म प्रवर्तकांमध्ये कमाई 50-50 विभागली जाईल. राज्याचे सांस्कृतिक विभाग तो हाताळणार आहे. व्यासपीठावर जाहिरातीही घेतल्या जाणार आहेत. (हेही वाचा: Merry Christmas Ott Release: कतरिना आणि विजय सेतूपतीचा 'मेरी ख्रिसमस' लवकर होणार ओटीटीवर रिलीज)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now