Bholaa Shankar: चिरंजीवी आणि कीर्ती सुरेश यांचा नवीन अगामी चित्रपटाच्या शूटिंगला होणार लवकरच सुरुवात

मेगास्टार चिरंजीवी आणि कीर्ती सुरेश लवकरच भोला शंकर या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटाचा मुहूर्त 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

Bhola Shankar Photo (Photo Credit Twiiter)

मेगास्टार चिरंजीवी (Chiranjeevi) आणि कीर्ती सुरेश (Keerthy Suresh) लवकरच भोला शंकर (Bhola Shankar) या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटाचा मुहूर्त 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे. मेहर शंकर दिग्दर्शित या चित्रपटाचे शूटिंग 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक चित्रपटासाठी एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे.  हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर मनोरंजन करणारा असून रामब्रह्म सुंकारा निर्मित करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपट समीक्षक  तरण आदर्श यांनी ट्विटरवर बातमी जाहीर केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement