Chhota Bheem Teaser: 'छोटा भीम'चा धमाकेदार टीझर रिलीज, 24 मे रोजी होणार प्रदर्शित

लहान मुलांचे आवडते कार्टून पात्र छोटा भीम आता मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. 'छोटा भीम अँड द कर्स ऑफ दमयन' या चित्रपटाचा टीझर १४ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट 24 मे 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Chhota Bheem Teaser: 'छोटा भीम'चा धमाकेदार टीझर रिलीज, 24 मे रोजी होणार प्रदर्शित
Chhota Bheem Teaser

Chhota Bheem Teaser: लहान मुलांचे आवडते कार्टून पात्र छोटा भीम आता मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. 'छोटा भीम अँड द कर्स ऑफ दमयन' या चित्रपटाचा टीझर १४ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट 24 मे 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात छोटा भीम आणि त्याचे साथीदार धोलापूर वाचवण्यासाठी परतणार आहेत. या चित्रपटात अनुपम खेर आणि मकरंद देशपांडे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यज्ञ भसीन छोटा भीमची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजीव चिलाका यांनी केले आहे. राजीव चिलाका आणि मेघा चिलाका हे निर्माते आहेत. श्रीनिवास चिलाकलापुडी आणि भरत लक्ष्मीपती हे सहनिर्माते आहेत.

पाहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 14, 2024 01:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).