Cannes 2024: जॅकलिन फर्नांडिस 77 व्या चित्रपट महोत्सवात होणार सहभागी – रीपोर्ट
जॅकलीन फर्नांडिस कान्स 2024 मध्ये सहभागी होण्याच्या तयारीत आहे. अद्याप कोणतेही अधिकृत समोर आलेली नाही. दरम्यान, या आधीही जॅकलीनने कान्स चित्रपट महोत्सवात हजेरी लावली होती.
- Read in
- मराठी
Cannes 2024: जॅकलीन फर्नांडिस(Jacqueline Fernandez) 77 व्या कान फिल्म फेस्टिव्हल (Cannes 2024)मध्ये सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान, कियारा अडवाणी, अदिती राव हैदरी, शोभिता धुलिपाला आणि ऐश्वर्या राय बच्चन यांसारख्या इतर भारतीय सेलिब्रिटीही कान्स चित्रपट महोत्सवात सामील होणार आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, तिने जागतिक मंचावर भारताचे प्रतिनिधीत्व करताना आपला आनंद व्यक्त केला आहे. जॅकलीन म्हणाली, "जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणे खूप छान वाटत आहे. त्याशिवाय, प्रतिष्ठित रेड कार्पेटवर चालणे हा एक सन्मान आहे. जिथे अनेक दिग्गज कलाकार आधीच चालले आहेत." दरम्यान यापूर्वी 2015 मध्ये जॅकलीनने कान्स चित्रपट महोत्सवात हजेरी लावली होती. (हेही वाचा:Cannes 2024: 'आई कर्तुत्ववान महिला होती, त्यांचा मुलगा असल्याचा अभिमान'; कान्स चित्रपट महोत्सवात स्मिता पाटील यांच्या मंथन चित्रपटच्या स्क्रीनिंगवर प्रतीक बब्बर याची प्रतिक्रीया )
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 16, 2024 01:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

