Urvashi Rautela Dress: अरब फॅशन वीकमध्ये उर्वशी रौतेलाने परिधान केला सोन्याचा ड्रेस, किंमत ऐकुन तुम्ही व्हाल थक्क

तिच्या लूक आणि आत्मविश्वासाने बरीच प्रशंसा मिळवली. उर्वशीने तिच्या लूकची एक झलकही इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

Urvashi Rautela (Photo Credit - Insta)

बॉलीवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या लूक आणि ड्रेसमुळे चर्चेत असते. ती नेहमीच तिच्या स्टाईलने (Urvashi Rautela Dress) चाहत्यांची मने जिंकत आली आहे. पण, यावेळी तिने केवळ तिच्या लूकने चाहत्यांना आश्चर्यचकित केले नाही तर एक कामगिरीही आपल्या नावावर केली आहे. अरब फॅशन वीकमध्ये सहभागी होणारी उर्वशी रौतेला ही पहिली भारतीय आहे, जी दोनदा या फॅशन वीकचा भाग झाली आहे. विशेष म्हणजे उर्वशी रौतेलाने यावेळी परिधान केलेला ड्रेस सोन्याचा होता. त्यासाठी 40 कोटी रुपये खर्च येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. उर्वशीने अरब फॅशन वीकमध्ये शो स्टॉपर रॅम्पवर थक्क केले आणि तिच्या स्टाईलने उपस्थित लोकांना आश्चर्यचकित केले. तिच्या लूक आणि आत्मविश्वासाने बरीच प्रशंसा मिळवली. उर्वशीने तिच्या लूकची एक झलकही इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by URVASHI RAUTELA 🇮🇳 (@urvashirautela)

 

View this post on Instagram

 

A post shared by URVASHI RAUTELA 🇮🇳 (@urvashirautela)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)