Singham Again Trailer Out: रोहित शेट्टीचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सिंघम अगेन'चा ट्रेलर रिलीज (Watch Video)

हा धमाकेदार ट्रेलर 4 मिनिटे 58 सेकंदांचा आहे. चित्रपटात अजय देवगण पुन्हा एकदा त्याच्या सिंघमच्या दमदार व्यक्तिरेखेत दिसत आहे, तर अक्षय कुमार आणि रणवीर सिंग यांनीही ट्रेलरमध्ये जबरदस्त ॲक्शन करून खळबळ उडवून दिली आहे.

Singham Again Trailer (फोटो सौजन्य - You Tube)

Singham Again Trailer Out: प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर बहुप्रतिक्षित सिंघम अगेन (Singham Again) चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत करीना कपूर खान, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, अक्षय कुमार हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर खूपच प्रेक्षणीय आहे. ट्रेलरमध्ये ॲक्शनसोबतच दमदार संवादही आहेत. ट्रेलरच्या सुरुवातीलाच रामायणाचा संदर्भ दिसतो. सुरुवातीला, सिंघमचा मुलगा त्याच्या वडिलांना विचारताना दिसतो की जर रावणसारखा कोणी त्याच्या आईचे अपहरण केले तर तुम्ही पण आईला एवढ्या दूर वाचवायला जाताल का? यावर सिंघम आपल्या मुलाला बोलतो गुगलवर बाजीराव सिंघम टाईप कर...म्हणजे तुला समजेल तुझा बाप काय चीज आहे.

हा धमाकेदार ट्रेलर 4 मिनिटे 58 सेकंदांचा आहे. चित्रपटात अजय देवगण पुन्हा एकदा त्याच्या सिंघमच्या दमदार व्यक्तिरेखेत दिसत आहे, तर अक्षय कुमार आणि रणवीर सिंग यांनीही ट्रेलरमध्ये जबरदस्त ॲक्शन करून खळबळ उडवून दिली आहे. चित्रपटात करीना कपूर खान सिंघमच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे, तर दीपिका पदुकोणने 'लेडी सिंघम'च्या दमदार भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यासोबतच टायगर श्रॉफ आणि अर्जुन कपूर देखील ॲक्शन आणि स्टाइलने भरलेल्या पात्रांमध्ये दिसत आहेत. रोहित शेट्टीच्या या ॲक्शनपॅक्ड चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे आणि हा चित्रपट दिवाळी 2024 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

रोहित शेट्टीचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सिंघम अगेन'चा ट्रेलर रिलीज, पहा व्हिडिओ - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now