Tiger 3: टायगर 3च्या रिलीजनंतर चाहत्यांची थिएटर बाहेर गर्दी, पाहा व्हिडिओ

आज झारखंडमध्ये टायगर 3 रिलीज झाल्यामुळे रांचीमधील सिनेमा हॉलबाहेर लांबच लांब रांग पाहायला मिळाली

Tiger 3:  आज दिवाळी निमित्त सलमान खान आणि कतरिना कैफच्या टायगर 3 चा चित्रपट रिलीज झाला आहे. टायगर 3 मध्ये शाहरुख खान आणि हृतिक रोशनचा कॅमिओ सामील झाल्याची बातमी आहे. दरम्यान, चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच चाहत्यांमध्ये याविषयी उत्साह दिसून येत आहे. आज झारखंडमध्ये टायगर 3 रिलीज झाल्यामुळे रांचीमधील सिनेमा हॉलबाहेर चाहत्यांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले असून यात इमरान हाश्मीही नायकाच्या भूमिकेत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)