Tejas Release Date Out: प्रतीक्षा संपली! कंगना राणौतच्या 'तेजस' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर, फायटर प्लेन उडवताना दिसणार

अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तारीख शेअर करत तेजसच्या रिलीज डेटचा खुलासा केला आहे. चित्रपटात कंगना एका पायलटचा प्रवास आणि देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या त्याच्या शौर्याची कथा दाखवणार आहे.

अभिनेत्री कंगना राणौत (Kangna Ranaut) लवकरच फायटर प्लेन उडवताना दिसणार आहे. कंगनाच्या 'तेजस' (Tejas) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात कंगना देशासाठी आपला जीव धोक्यात घालताना दिसणार आहे. आता अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तारीख शेअर करत तेजसच्या रिलीज डेटचा खुलासा केला आहे. चित्रपटात कंगना एका पायलटचा प्रवास आणि देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या त्याच्या शौर्याची कथा दाखवणार आहे. इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत कंगना रणौतने लिहिले, आमच्या शूर वायुसेनेच्या वैमानिकांच्या शौर्याचा सन्मान! तेजस 20 ऑक्टोबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यासोबत कंगनाने या चित्रपटाचे वर्णन भारतातील पहिली एरियल अॅक्शन फिल्म म्हणून केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now