Laal Singh Chaddha: आयपीएल 2022च्या फायनल दरम्यान 'लाल सिंग चड्ढा'चा ट्रेलर होणार लॉन्च

तसेच IPL 2022ची फायनल 29 मे रोजी रात्री 8 वाजता सुरु होईल. आमिर खानच्या चित्रपटाचा ट्रेलर पहिल्या डावानंतर साधारण 11 षटकांच्या म्हणजे रात्री 9:00 ते 9:30 दरम्यान दुसऱ्या टाइमआऊट दरम्यान प्रदर्शित होईल.

Laal Singh Chaddha (Photo Credit - Twitter)

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा (Amir Khan) 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) हा या वर्षातील बहुप्रतिक्षित हिंदी चित्रपटांपैकी एक आहे. त्यामुळेच आमिर खान प्रॉडक्शन या चित्रपटाचा खास कार्यक्रम स्पेशल करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार 'लाल सिंह चड्ढा'चा ट्रेलर आयपीएल 2022च्या फायनल (IPL 2022 Final) दरम्यान लॉन्च केला जाईल. त्याच वेळी, निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्याची वेळ देखील उघड केली आहे. इंस्टाग्रामवर 'लाल सिंह चड्ढा'चे पोस्टर शेअर करताना आमिर खान प्रॉडक्शनने लिहिले की, 'लाल सिंग चड्ढाचा ट्रेलर उद्या आयपीएल 2022 च्या फायनलच्या पहिल्या डावाच्या दुसऱ्या टाइमआऊट दरम्यान लॉन्च केला जाईल. तसेच IPL 2022ची फायनल 29 मे रोजी रात्री 8 वाजता सुरु होईल. आमिर खानच्या चित्रपटाचा ट्रेलर पहिल्या डावानंतर साधारण 11 षटकांच्या म्हणजे रात्री 9:00 ते 9:30 दरम्यान दुसऱ्या टाइमआऊट दरम्यान प्रदर्शित होईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aamir Khan Productions (@aamirkhanproductions)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)