Laal Singh Chaddha: आयपीएल 2022च्या फायनल दरम्यान 'लाल सिंग चड्ढा'चा ट्रेलर होणार लॉन्च

'लाल सिंग चड्ढाचा ट्रेलर उद्या आयपीएल 2022 च्या फायनलच्या पहिल्या डावाच्या दुसऱ्या टाइमआऊट दरम्यान लॉन्च केला जाईल. तसेच IPL 2022ची फायनल 29 मे रोजी रात्री 8 वाजता सुरु होईल. आमिर खानच्या चित्रपटाचा ट्रेलर पहिल्या डावानंतर साधारण 11 षटकांच्या म्हणजे रात्री 9:00 ते 9:30 दरम्यान दुसऱ्या टाइमआऊट दरम्यान प्रदर्शित होईल.

Laal Singh Chaddha: आयपीएल 2022च्या फायनल दरम्यान 'लाल सिंग चड्ढा'चा ट्रेलर होणार लॉन्च
Laal Singh Chaddha (Photo Credit - Twitter)

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा (Amir Khan) 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) हा या वर्षातील बहुप्रतिक्षित हिंदी चित्रपटांपैकी एक आहे. त्यामुळेच आमिर खान प्रॉडक्शन या चित्रपटाचा खास कार्यक्रम स्पेशल करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार 'लाल सिंह चड्ढा'चा ट्रेलर आयपीएल 2022च्या फायनल (IPL 2022 Final) दरम्यान लॉन्च केला जाईल. त्याच वेळी, निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्याची वेळ देखील उघड केली आहे. इंस्टाग्रामवर 'लाल सिंह चड्ढा'चे पोस्टर शेअर करताना आमिर खान प्रॉडक्शनने लिहिले की, 'लाल सिंग चड्ढाचा ट्रेलर उद्या आयपीएल 2022 च्या फायनलच्या पहिल्या डावाच्या दुसऱ्या टाइमआऊट दरम्यान लॉन्च केला जाईल. तसेच IPL 2022ची फायनल 29 मे रोजी रात्री 8 वाजता सुरु होईल. आमिर खानच्या चित्रपटाचा ट्रेलर पहिल्या डावानंतर साधारण 11 षटकांच्या म्हणजे रात्री 9:00 ते 9:30 दरम्यान दुसऱ्या टाइमआऊट दरम्यान प्रदर्शित होईल.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 28, 2022 05:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).