Vikram Vedha चा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस, 30 सप्टेंबरला थिएटरमध्ये होणार रिलीज

या ट्रेलरच्या मध्यभागी राधिका आपटे आणि सैफ अली खान यांच्या रोमान्सची झलकही दाखवण्यात आली आहे. सैफ आणि हृतिक स्टारर हा चित्रपट 30 सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

Vikram Vedha चा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस, 30 सप्टेंबरला थिएटरमध्ये होणार रिलीज
Vikram Vedha Trailer (Photo Credit - YouTube)

हृतिक रोशन स्टारर 'विक्रम वेधा'चा (Vikram Vedha) दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात अभिनेता हृतिक रोशन आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते आणि अखेर त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलरमध्ये हृतिक रोशन दमदार अॅक्शन अवतारात दिसत आहे आणि सैफ अली खान पोलिसाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी संयुक्तपणे केले आहे. अॅक्शनने भरलेला हा ट्रेलर प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. या ट्रेलरच्या मध्यभागी राधिका आपटे आणि सैफ अली खान यांच्या रोमान्सची झलकही दाखवण्यात आली आहे. सैफ आणि हृतिक स्टारर हा चित्रपट 30 सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाची टक्कर ऐश्वर्या रायच्या पोन्नयान सेल्वन या चित्रपटाशी होणार आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 08, 2022 05:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).