The Money Heist Anthem: मनी हाईस्ट चे अँथम सॉंग रिलीज; अनिल कपूर, श्रुति हसन, राधिका आपटे यांच्यासह 'या' कलाकरांची वर्णी (Watch Video)

या नव्या सीजनचे अँथम नेटफ्लिक्सने रिलीज केले असून याचे टायटल द हाईस्ट अँथम असे आहे.

The Money Heist Anthem (Photo Credits: Youtube)

नेटफ्लिक्स वरील लोकप्रिय वेबसिरीज मनी हाईस्ट चा पाचवा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या सीजनचे अँथम नेटफ्लिक्सने रिलीज केले असून याचे टायटल 'द हाईस्ट अँथम' असे आहे. या व्हिडिओमध्ये अनिल कपूर, राणा डग्गुबत्ती, श्रुति हसन, हार्दिक पांड्या, न्युक्लिया, विक्रांत म्हसे, राधिका आपटे आणि इतर कलाकारांचा सहभाग आहे. मनी हाईस्टच्या पाचव्या सीजनची सर्व भारतीय चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत, असे या व्हिडिओतून प्रतीत होत आहे. 3 सप्टेंबर पासून या शो चा पाचवा सीजन नेटफ्लिक्सवर येणार असून हा शो हिंदी, तमिळ, तेलुगू भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)