लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ कर्नाटक सरकारने जाहीर केला दोन दिवसांचा राजकीय दुखवटा

लता दीदींच्या जाण्याने संपूर्ण देश शोकसागरात बुडालेला आहे

Lata Mangeshkar (Photo Credit: Facebook)

देशाची महान गायिका, गानकोकिळा लता मंगेशकर यांचे आज सकाळी निधन झाले. लता दीदींच्या जाण्याने संपूर्ण देश शोकसागरात बुडालेला आहे. लता दीदी यांच्यावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचे पार्थिव शिवाजी पार्कवर पोहोचले असून, शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. राज्य सरकारने दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला असून उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. आता लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ कर्नाटक सरकारने दोन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. यावेळी सर्व सार्वजनिक मनोरंजनाचे कार्यक्रम निषिद्ध आहेत आणि राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर घेतला जाईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी एका. निवेदनात म्हटले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement