Tabassum Govil Passes Away: अभिनेत्री तबस्सुम यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन; 'फूल खिले हैं गुलशन गुलशन' शोमुळे मिळाली होती प्रसिद्धी
हा शो 1972 ते 1993 या काळात दूरदर्शनवर प्रसारित झाला.
प्रसिद्ध अभिनेत्री आणि टॉक शो होस्ट तबस्सुमच्या चाहत्यांसाठी दु:खद बातमी आहे. तबस्सुम यांनी वयाच्या 78 व्या वर्षी जगाचा कायमचा निरोप घेतला आहे. बातम्यांनुसार, तबस्सुम यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यामुळे त्यांना घाईघाईने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अभिनेत्रीचा रुग्णालयात मृत्यू झाला. तबस्सुम यांच्या निधनाच्या वृत्ताने बॉलीवूड हादरले असून, चाहते सोशल मीडियावर प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्रीला श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
'फूल खिले हैं गुलशन गुलशन' या शोद्वारे त्या लोकप्रिय झाल्या होत्या. हा शो 1972 ते 1993 या काळात दूरदर्शनवर प्रसारित झाला. यामध्ये तबस्सुम चित्रपटातील व्यक्तिमत्त्व आणि टेलिव्हिजन कलाकार आणि अभिनेत्रींच्या मुलाखती घ्यायच्या. तबस्सुम यांचा जन्म 9 जुलै 1944 रोजी मुंबईत झाला. त्यांचे वडील अयोध्यानाथ सचदेव हे स्वातंत्र्यसैनिक होते आणि त्यांची आई असगरी बेगम लेखिका आणि पत्रकार होत्या. 1947 मध्ये फक्त तीन वर्षांचे असताना 'मेरा सुहाग' या चित्रपटातून त्यांनी चित्रपट प्रवासाला सुरुवात केली. अरुण गोविल यांचा मोठा भाऊ विजय गोविल यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)