Swatantrya Veer Savarkar Teaser: स्वातंत्र वीर सावरकर चित्रपटाचा टीझर आऊट; रणदीप हुड्डा दिसला दमदार स्टाईलमध्ये, Watch

रणदीप हुड्डा यांनी या चित्रपटाचे पहिले पोस्टर आणि टीझर व्हिडिओ सोशल मीडियावर रिलीज केला आहे.

Swatantrya Veer Savarkar (PC - Twitter)

Swatantrya Veer Savarkar Teaser: स्वातंत्र वीर सावरकर या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात रणदीप हुड्डा चित्रपटाचा लूक खूपच दमदार दिसत आहे. यामध्ये तो अभिनेता आणि दिग्दर्शक अशा दोघांच्याही भूमिका साकारत आहे. चित्रपटाच्या फर्स्ट लूकसोबतच टीझर व्हिडिओही सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. वीर सावरकरांच्या 140 व्या जयंतीनिमित्त हा टीझर रिलीज करण्यात आला आहे. रणदीप हुड्डा यांनी या चित्रपटाचे पहिले पोस्टर आणि टीझर व्हिडिओ सोशल मीडियावर रिलीज केला आहे. टीझर व्हिडिओमध्ये रणदीप हुड्डा यांच्या आवाजात चित्रपटाची कथा मांडण्यात आली आहे. वीर सावरकरांच्या भूमिकेत रणदीप हुड्डा साखळदंडात वेढलेला दिसत आहे. (हेही वाचा - Snehal Rai: 'इच्छाधारी नागिन'मध्ये दिसलेल्या स्नेहल रायचा मोठा खुलासा; 10 वर्षांपूर्वी केलं राजकारणी माधवेंद्र कुमार राय यांच्याशी लग्न)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)