Stree 2 Aavailable on OTT: खुशखबर! श्रद्धा कपूर, राजकुमार राव स्टारर ब्लॉकबस्टर 'स्त्री 2' ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध; जाणून घ्या सविस्तर

श्रद्धा कपूर, राजकुमार राव, अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी आणि पंकज त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका असलेला, हॉरर कॉमेडी स्त्री 2 गेल्या 15 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल झाला आणि सहा आठवड्यांनंतरही चित्रपटगृहात तो यशस्वीपणे चालू आहे.

Stree 2

Stree 2 Aavailable on OTT: श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या स्त्री 2 चित्रपटाने चांगलेच बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. चाहते या चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत होते, पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट इतकी कमाई करेल असे कोणालाच वाटले नव्हते. स्त्री 2 ने रिलीज झाल्यापासून कलेक्शनच्या बाबतीत अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. चित्रपटगृहांमध्ये खळबळ माजवल्यानंतर हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. नुकताच हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झळा आहे. स्त्रीचा पहिला पार्ट डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटाचा सीक्वल ऍमेझॉन प्राइमवर रिलीज करण्यात आला आहे. मात्र त्यामध्ये एक ट्विस्ट आहे. ऍमेझॉन प्राइमवर हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. ऍमेझॉन प्राइमवर स्त्री 2 हा रेंटवर उपलब्ध आहे. अवघ्या 349 रुपयांमध्ये तुम्ही हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासोबत पाहू शकता.

श्रद्धा कपूर, राजकुमार राव, अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी आणि पंकज त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका असलेला, हॉरर कॉमेडी स्त्री 2 गेल्या 15 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल झाला आणि सहा आठवड्यांनंतरही चित्रपटगृहात तो यशस्वीपणे चालू आहे. हा चित्रपट यंदा भारतात 600 कोटी रुपयांची कमाई करणारा पहिला हिंदी चित्रपट आहे आणि त्याने शाहरुख खानचा जवान आणि पठाण, देओलचा गदर 2 आणि आमिर खानचा दंगल यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकले आहे. (हेही वाचा: Emergency Movie: काही कट्स नंतर कंगना रणौतचा 'इमर्जन्सी' होऊ शकतो रिलीज; सेन्सॉर बोर्डाकडून स्पष्टीकरण)

ब्लॉकबस्टर 'स्त्री 2' ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now