गायक केके यांचे पार्थिव मुंबईला आणण्यात आले; उद्या सकाळी 10 वाजता अंधेरी येथील निवासस्थानी होणार अंत्यसंस्कार (Watch Video)
रात्री 10.30 च्या सुमारास त्यांना कलकत्ता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले
गायक केके यांचे पार्थिव मुंबई, महाराष्ट्रात आणण्यात आले आहे. प्रसिद्ध बॉलीवूड गायक कृष्णकुमार कुन्नथ, जे केके म्हणून प्रसिद्ध आहेत, यांचे वयाच्या 53 व्या वर्षी कोलकाता येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कोलकाता येथील नजरुल मंच येथे एका मैफिलीत सादरीकरण केल्यानंतर, ते हॉटेलमध्ये परतले आणि खाली कोसळले. रात्री 10.30 च्या सुमारास त्यांना कलकत्ता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. केके यांच्या निधनामुळे संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. उद्या सकाळी 10 वाजता त्यांच्या अंधेरी येथील निवासस्थानी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)