Kailash Kher Angry: खेलो इंडिया कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लखनऊमध्ये पोहोचलेले गायक कैलाश खेर संतापले, आयोजकांवर भडकले (Watch Video)

राजधानी लखनऊमध्ये खेलो इंडिया (Khelo India) युनिव्हर्सिटी गेम्सच्या उद्घाटन समारंभात प्रसिद्ध गायक कैलाश खेर (Kailash Kher) यांचा संयम सुटला. लखनौमधील बीबीडी येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी आयोजकांना फटकारले.

देशभरातील खेळाडू सध्या उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) व्यस्त आहेत. मात्र त्याआधी उद्घाटन सोहळ्यात मोठा वाद चव्हाट्यावर आला आहे. राजधानी लखनऊमध्ये खेलो इंडिया (Khelo India) युनिव्हर्सिटी गेम्सच्या उद्घाटन समारंभात प्रसिद्ध गायक कैलाश खेर (Kailash Kher) यांचा संयम सुटला. लखनौमधील बीबीडी येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी आयोजकांना फटकारले. व्हायरल व्हिडिओमध्ये खेर रागाने सांगत आहेत की, त्यांना एक तास थांबायला लावले. तसेच अयोजकांना शिष्टाचार शिकण्यास सांगितले. ते म्हणाले, हा खेलो इंडिया कसा आहे? असे घडते का? हे असे चालत नाही. ते म्हणाले की कल्पना करा की एखाद्या स्टारला इतका त्रास सहन करावा लागतो. खेळाडूंचे किती नुकसान झाले असेल. रिपोर्ट्सनुसार, कैलाश खेर सुमारे एक तास ट्रॅफिक जॅममध्ये अडकले होते, ज्यामुळे ते संतापले होते.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now