Jawan Release Date: मोशन पोस्टर शेअर करुन शाहरुखचा 'जवान' 'या' दिवशी होणार प्रर्दशित, पुन्हा दिसणार दमदार भूमिकेत

आता दोघेही लवकरच 'जवान' (Jawan) चित्रपटात दिसणार आहेत. दरम्यान, या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.

Jawan (Photo Credit - Twitter)

शाहरुख खान (Saha Rukh Khan) आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukon) यांची केमिस्ट्री छान दिसतेय. अलीकडेच दोघे 'पठाण' (Pathan) चित्रपटात एकत्र दिसले होते. आता दोघेही लवकरच 'जवान' (Jawan) चित्रपटात दिसणार आहेत. दरम्यान, या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. शाहरुख खानने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर 'जवान'चे नवीनतम मोशन पोस्टर शेअर करून चित्रपटाची नवीन रिलीज तारीख उघड केली आहे. 'जवान' हा चित्रपट आता 7 सप्टेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकतेच रिलीज झालेले मोशन पोस्टर पाहिल्यानंतर चाहते खूप उत्सुक दिसत आहेत. या मोशन पोस्टरमध्ये किंग खान अतिशय दमदार स्टाईलमध्ये दिसत आहे. शाहरुखच्या हातात भाला आणि अंगभर पट्टी आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)