शहजादा स्टार Kartik Aaryan ने आपल्या लॅम्बोर्गिनी गाडीसाठी भरले चालान; Mumbai Traffic Police म्हणतात- 'कोणीही नियमांची पायमल्ली करू शकत नाही'
मुंबई वाहतूक पोलिसांनी कार्तिकच्याच चित्रपटातील एक संवाद वापरून घडला प्रसंग नमूद केला आहे
कार्तिक आर्यनने शुक्रवारी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन त्याच्या नवीन रिलीज झालेल्या 'शेहजादा' चित्रपटासाठी बाप्पांचे आशीर्वाद घेतले. परंतु यावेळी अभिनेता कायदेशीर अडचणीत सापडला. कार्तिकने त्याची लक्झरी ब्लॅक लॅम्बोर्गिनी गाडी चुकीच्या बाजूला पार्क केल्याबद्दल त्याला चालान मिळाले. आता मुंबई वाहतूक पोलिसांनी कार्तिकच्याच चित्रपटातील एक संवाद वापरून घडला प्रसंग नमूद केला आहे व कोणीही नियमांची पायमल्ली करू शकत नसल्याचे सांगितले आहे.
मुंबई पोलीस ट्वीट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)