Shehnaaz Gill Viral Video: पुरस्कार सोहळ्यात शहनाज गिल गात होती गाणं; अज़ान ऐकल्यानंतर मध्येचं थांबली अभिनेत्री, पहा व्हायरल व्हिडिओ
अजान संपेपर्यंत अभिनेत्रीने तिचे गाणे गायले नाही. त्याच्या या व्हिडिओवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत असले तरी काहींनी अभिनेत्रीला ट्रोलही केलं आहे.
Shehnaaz Gill Viral Video: नुकतीच शहनाज गिल (Shehnaaz Gill) काल रात्री झालेल्या एका अवॉर्ड फंक्शनमध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईत आली होती. तिला येथे 'डिजिटल पर्सनॅलिटी ऑफ द इयर' पुरस्काराने गौरविण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान, जेव्हा बिग बॉस 13 ची स्पर्धक अवॉर्ड मिळाल्यानंतर स्टेजवर तिचे पंजाबी गाणे गात होती, त्याच वेळी अजान सुरू झाले. शहनाज गिलने अजान ऐकताच आपले गाणे थांबवले आणि मान खाली घातली. अजान संपेपर्यंत अभिनेत्रीने तिचे गाणे गायले नाही. त्याच्या या व्हिडिओवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत असले तरी काहींनी अभिनेत्रीला ट्रोलही केलं आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)