IFFI 2023: डान्स करताना शाहिद कपूरचा गेला तोल, स्टेजवरून पडला खाली

व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, तोल गमावल्यानंतर शाहिद कपूर लगेच स्वत:वर नियंत्रण ठेवतो आणि उठतो आणि आपले डान्स परफॉर्मन्स पूर्ण करतो.

54व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) मध्ये डान्स परफॉर्मन्स दरम्यान, बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा अचानक तोल गेला आणि तो स्टेजवरून पडला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, तोल गमावल्यानंतर शाहिद कपूर लगेच स्वत:वर नियंत्रण ठेवतो आणि उठतो आणि आपले डान्स परफॉर्मन्स पूर्ण करतो. या डान्स परफॉर्मन्सदरम्यान शाहिद कपूरने ब्लॅक स्लीव्हलेस टी-शर्ट, पँट आणि गडद सनग्लासेस घातले होते. गोव्यात 54 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित केला जात आहे, ज्याचे उद्घाटन सोमवारी झाले.

व्हिडिओ पहा-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement