Shah Rukh Khan भारतामध्ये परतला; अमेरिकेत अपघाताच्या वृत्तानंतर मुंबई विमानतळावर झाला स्पॉट (Watch Video)

आता तो मुंबई मध्ये परतला आहे.

Shah Rukh Khan (PC - Facebook)

अमेरिकेमध्ये शाहरूख खानचा एका सिनेमाच्या शूटिंग दरम्यान अपघात झाला असून त्याच्या नाकावर शस्त्रक्रिया झाली असल्याचे मीडीया रिपोर्ट्स समोर आले होते. मात्र या चर्चांमध्ये बुधवारी पहाटे मुंबई विमानतळावर शाहरूख खान स्पॉट झाला आहे. रिपोर्टप्रमाणे त्याच्या नाकावर कोणतेही बॅन्डेज, खुणा दिसून आलेल्या नाहीत. कॅज्युअल लूक मध्ये शाहरूख सुस्थितीत अमेरिकेतून मुंबईत परतला असल्याचं चित्र पाहून अनेकांचा जीव भांड्यात पडला आहे. शाहरूख सोबत त्याचा लेक आणि पत्नी देखील आले. दरम्यान शाहरूख ने विमानतळावर मीडीयाशी प्रकृती बाबत कोणतेही अपडेट देणं टाळलं आहे. नक्की वाचा: Shah Rukh Khan ठरला जगातला श्रीमंत कलाकारांच्या यादीत चौथा Richest Actor .

पहा शाहरूखचा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)