Sexual Assault Case: स्त्री 2 चा कोरिओग्राफर जानी मास्टरविरुद्ध 21 वर्षांच्या मुलीचे वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप; गुन्हा दाखल, तपास सुरु
जानीने 'स्त्री 2' व्यतिरिक्त 'किसी का भाई किसी की जान' आणि 'राधे'मध्ये सलमान खानची गाणी कोरिओग्राफी केली होती. सलमान व्यतिरिक्त, जानीने आत्तापर्यंत राम चरण, ज्युनियर एनटीआर, चिरंजीवी, विजय, धनुष आणि पवन कल्याणसह अनेक मोठ्या सेलिब्रिटींसोबत काम केले आहे.
Sexual Assault Case: दक्षिणेतील प्रसिद्ध कोरिओग्राफर शेख जानी बाशा उर्फ जानी मास्टर याच्यावर 21 वर्षीय तरुणीने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. पीडितेने तेलंगणातील सायबराबाद रायदुर्गम पोलीस ठाण्यात जानीविरुद्ध शून्य एफआयआर दाखल केला आहे. जानी याने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'स्त्री 2' या चित्रपटातील 'आई नही' या गाण्यासह अनेक हिट गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. पिडीत मुलीने जानीसोबत अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम केले असून, जानी गेल्या अनेक महिन्यांपासून तिचे शोषण करत असल्याचा आरोप तरुणीने केला आहे. चेन्नई, मुंबई आणि हैदराबादमध्ये वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी शूटिंग करत असताना जानीने तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचे पीडितेने सांगितले. मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि कोरिओग्राफरला अटक केली. द हिंदूच्या वृत्तानुसार, 'एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, जानीने 'स्त्री 2' व्यतिरिक्त 'किसी का भाई किसी की जान' आणि 'राधे'मध्ये सलमान खानची गाणी कोरिओग्राफी केली होती. सलमान व्यतिरिक्त, जानीने आत्तापर्यंत राम चरण, ज्युनियर एनटीआर, चिरंजीवी, विजय, धनुष आणि पवन कल्याणसह अनेक मोठ्या सेलिब्रिटींसोबत काम केले आहे. (हेही वाचा: Goregaon Rape Case: मुंबईत पुन्हा लहान मुलीवर लैंगिक अत्याचार; गोरेगावमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर 29 वर्षीय तरुणाकडून बलात्कार)
कोरिओग्राफर जानी मास्टरविरुद्ध मुलीचे वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)