Satyameva Jayate 2 Trailer: सत्यमेव जयते 2 चा ट्रेलर प्रदर्शित; Salman Khan कडून John Abraham चं कौतुक करत 'अंतिम' सोबत बॉक्सऑफिसवर टक्कर देणार्या सिनेमाला शुभेच्छा
सलमान खानचा 'अंतिम' आणि जॉन अब्राहमचा 'सत्यमेव जयते 2' या सिनेमाची बॉक्सऑफिसवर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटाला टक्कर होणार आहे. कोविड 19 संकटानंतर आता पुन्हा सिनेमागृहं सुरू झाल्याने अनेक बिग बजेट सिनेमे एका पाठोपाठ रिलीज करण्याकडे कलाकार, निर्मात्यांचं लक्ष असणार आहे.
John Abraham चा आगामी Satyameva Jayate 2 सिनेमाचा ट्रेलर आज (25 ऑक्टोबर) लॉन्च करण्यात आला आहे. 25 नोव्हेंबरला हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तर 26 नोव्हेंबरला सलमान खानचा 'अंतिम' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सलमान खानने आज ट्वीटरच्या माध्यमातून 'सत्यमेव जयते 2' च्या ट्रेलरचं कौतुक करत जॉन सह सिनेमाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 'सत्यमेव जयते 2' 25 नोव्हेंबरला तर सलमान खानची प्रमुख असलेला आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित 'अंतिम' 26 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे.
सत्यमेव जयते 2 ट्रेलर
सलमान खान ट्वीट
Very nice trailer, congrats and best wishes for release on 25th Nov … @TheJohnAbraham #BhushanKumar #MilapZaveri https://t.co/poC1qTYEvV
— Salman Khan (@BeingSalmanKhan) October 25, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 25, 2021 05:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

