बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानने स्टार किड असूनही इंडस्ट्रीत स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे. सारा तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. चाहत्यांना साराच्या पोस्टमध्ये नेहमीच तिचे वेगवेगळे अवतार पाहायला मिळतात. पतौडी कुटुंबाची नात सारा अली खान सध्या इस्तंबूलमध्ये सुट्टी साजरी करत आहे. यादरम्यान 26 वर्षीय साराने तिचा बिकिनीतील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामुळे कडक उन्हात इंटरनेटचा पारा आणखीच वाढला आहे. या फोटोमध्ये सारा निळ्या आणि पिवळ्या रंगाची बिकिनी घालून पूलमध्ये दिसत आहे. अशाप्रकारे यावेळी साराने तिचा अतिशय बोल्ड आणि सिझलिंग लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)