रणबीर कपूरने बुक केली Adipurush ची 10,000 तिकिटे; वंचित मुलांना मोफत दाखवणार Prabhas स्टारर चित्रपट- Reports

काल 'द काश्मीर फाइल्स'चे निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी त्यांच्या वैयक्तिक इंस्टाग्राम अकाउंटवर सांगितले की, ते वंचित मुलांना 'आदिपुरुष'ची 10,000 तिकिटे वितरीत करणार आहेत.

Adipurush

ओम राऊत याचा 'आदिपुरुष' हा पौराणिक चित्रपट सध्या चर्चेत आहे. प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे लोकांमध्ये उत्सुकता वाढत आहे. हा चित्रपट 16 जूनला प्रदर्शित होणार असून, बॉक्स ऑफिसवर तो जबरदस्त ओपनिंग करेल अशी अपेक्षा केली जात आहे. अशात रणबीर कपूरने वंचित मुलांसाठी आदिपुरुष चित्रपटाची 10,000 तिकिटे बुक केली आहेत. साधारण 10,000 वंचित मुलांना चित्रपटाचा आनंद घेता यावा म्हणून रणबीर कपूर त्यांना मोफत चित्रपट दाखवणार आहे.

काल 'द काश्मीर फाइल्स'चे निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी त्यांच्या वैयक्तिक इंस्टाग्राम अकाउंटवर सांगितले की, ते वंचित मुलांना 'आदिपुरुष'ची 10,000 तिकिटे वितरीत करणार आहेत. आता अहवालानुसार रणबीर कपूरनेही अशीच घोषणा केली आहे. (हेही वाचा: सोनू सूद करणार ओडिशातील रेल्वे दुर्घटनाग्रस्तांना मदत, उचलणार शिक्षणाची जबाबदारी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now