Yentamma Song: साऊथ इंडियन लूकमध्ये Salman Khan सोबत Ram Charan ने केला धमाकेदार डान्स, चाहते म्हणाले- मस्त जोडी
'किसी का भाई किसी की जान' चित्रपटाच्या 'येंटम्मा'मध्येही एक सरप्राईज पाहायला मिळाले आहे. या गाण्यात राम चरण (Ram Charan) देखील आहे.
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे आणखी एक गाणे रिलीज झाले आहे, जे चाहत्यांची उत्सुकता वाढवत आहे. या चित्रपटाच्या नव्या गाण्याचे नाव 'येंटम्मा' आहे. 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटाच्या 'येंटम्मा'मध्येही एक सरप्राईज पाहायला मिळाले आहे. या गाण्यात राम चरण (Ram Charan) देखील आहे. विशेष म्हणजे या गाण्यात सलमान खानसोबत राम चरण, व्यंकटेश आणि पूजा हेगडे 'नाटू नाटू'च्या हुक स्टेपप्रमाणे नाचताना दिसत आहेत. चित्रपटाचे गाणे काही मिनिटांतच सोशल मीडिया आणि यूट्यूबवर व्हायरल झाले आहे.
पहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)