Rakhi Sawant on PM Modi: मी दोन रात्र झोपू शकले नाही, पंतप्रधान मोदींनी माझं आयुष्य बर्बाद केलं! अभिनेत्री राखी सावंतचे थेट पंतप्रधान मोदींवर आरोप
मी दोन रात्र झोपू शकले नाही, पंतप्रधान मोदींनी माझं आयुष्य बर्बाद केलं, असे आरोप अभिनेत्री राखी सावंत हिने पंतप्रधान मोदींवर केले आहेत.
अभिनेत्री राखी सावंत (Actress Rakhi Sawant) कायमच कुठल्यातरी कॉन्ट्रोव्हरसीतून (Controversy) चर्चेत असते. पण यावेळी राखी सावंतने थेट पंतप्रधान मोदींवर (PM Modi) निशाणा साधला आहे. मी दोन रात्र झोपू शकले नाही, पंतप्रधान मोदींनी माझं आयुष्य बर्बाद केलं, असे आरोप अभिनेत्री राखी सावंत हीने पंतप्रधान मोदींवर केले आहे. संबंधीत माहिती देताना राखी म्हणाली मी दोन दिवसापूर्वीच कोव्हिड लसीचा (Covid Vaccination) बुस्टर डोस (Booster Dose) घेतला त्यानंतर मी दोन रात्र झोपू शकले नाही,माझे डोळे सुजलेले आहेत. पंतप्रधान मोदींना हा बुस्टर डोस घ्यायला सांगून माझं आयुष्य बर्बाद केलं आहे. तसेच हा बुस्टर डोस 70 ते 90 वर्षापुढील नागरिकांनी घ्यायला हवा असा सल्ला अभिनेत्री राखी सावंतने दिला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)