Prasad Khandekar: 'एकदा येऊन तर बघा' नंतर प्रसाद खांडेकरनं केली नव्या चित्रपटाची घोषणा
या व्हिडीओच्या माझ्यमातून प्रसादनं त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.
अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद खांडेकरचा (Prasad Khandekar) 'एकदा येऊन तर बघा' (Ekda Yeun Tar Bagha) नंतर आता नव्या चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. नुकताच प्रसादनं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माझ्यमातून प्रसादनं त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. अभिनेता स्वप्नील जोशी,अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता माळी यांच्यासह प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, रोहित माने, ओंकार राऊत, प्रियदर्शनी इंदलकर, निखिल रत्नपारखी, सचिन गोस्वामी, चेतना भट, प्रभाकर मोरे, निखिल बने, श्याम राजपूत, श्लोक खांडेकर, प्रमोद बनसोडे, ऐश्वर्या बडदे हे कलाकार प्रसादनं शेअर केलेल्या या व्हिडीओत दिसत आहेत.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)