लोकप्रिय गायक KK यांचे निधन; PM Narendra Modi यांनी व्यक्त केला शोक (See Tweet)

केके 53 वर्षांचे होते. त्यांनी हिंदीत 200 हून अधिक गाणी गायली आहेत

Singer KK (Pic Credit: FB )

भारतीय चित्रपटसृष्टीला एक मोठा धक्का बसला आहे. गायक केके यांचे मंगळवारी कोलकाता येथे निधन झाले. कार्यक्रमानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना तातडीने सीएमआरआय रुग्णालयात आणण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. केके 53 वर्षांचे होते. त्यांनी हिंदीत 200 हून अधिक गाणी गायली आहेत. केके यांचे अचानक निघून जाणे त्यांच्या चाहत्यांसाठी चटका लावून जाणारे आहे. केके यांच्या निधनावर पीएम नरेंद्र मोदी यांनीदेखील शोक व्यक्त केला आहे. याबाबत केलेल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, 'प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ यांच्या अकाली निधनाने दु:ख झाले. के.के यांच्या गाण्यांचे सर्व वयोगटातील लोकांमध्‍ये विविध प्रकारच्या भावनांचे प्रतिबिंब दिसून आले. त्यांच्या गाण्यातून आम्ही त्यांची आठवण कायम ठेवू. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांप्रती संवेदना.'

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement