Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Photos: परिणीति चोपड़ा-राघव चड्ढा यांच्या 'Pearl-White' थीम वर आधारित लग्नसोहळ्यातील खास क्षण आले समोर (View Pics)
'Pearl-White' थीम वर परिणीती आणि राघव चढ्ढा यांचे आऊटफीट्स डिझाईन करण्यात आले होते. त्याच रंगसंगतीमध्ये सजावटही पहायला मिळत आहे.
राजस्थान मधील उदयपूर मध्ये ताज पॅलेस मध्ये काल (24 सप्टेंबर) खासदार राघव चढ्ढा अभिनेत्री परिणिती चोप्रा सोबत विवाहबद्ध झाले. त्यांच्या लग्नसोहळ्यातील काही क्षण आता समोर आले आहे. परिणीती आणि राघव दोघांचेही लग्नाचे आऊटफीट्स हे पेस्टल शेड मध्ये डिझाईन करण्यात आले होते. दरम्यान परिणीतीच्या चुनरी वर खास 'राघव' असं नाव विणण्यात आले होते. त्यांच्या साध्या लूकवर नेटकरी फिदा असल्याचं पहायला मिळालं आहे. आता 30 सप्टेंबरला त्यांच्या लग्नाचं रिसेप्शन गुडगावला देखील आयोजित करण्यात आलं आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)