Orry Income Source Reveals: अखेर ऑरीने उघड केला त्याच्या उत्पन्नाचा प्राथमिक स्रोत; एका लग्नासाठी मिळतात 15 ते 30 लाख रुपये

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ऑरीने अनेक बाबी स्पष्ट केल्या आहेत. तो म्हणतो, 'लोकांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून मी त्यांना 'आनंद' देतो. मी आनंदाचा संदेश घेऊन येतो.

Orry Income Source Reveals: सोशल मीडिया वरील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व ओरहान अवत्रामणी उर्फी ऑरी याला आजकाल जवळजवळ सर्वजण ओळखतात. ऑरी हा बॉलिवूडच्या प्रत्येक पार्टीची शान समजला जातो. बड्या फिल्म स्टार्सपासून ते स्टार किड्सपर्यंत अनेकजण ऑरीसोबत पोझ देताना दिसले आहेत. बॉलिवूडच्या मोठ-मोठ्या इव्हेंटमध्ये ऑरी दिसून येतो. मात्र हा ऑरी नेमका कोण आहे? आणि तो पोटा-पाण्यासाठी काय करतो? याबाबत काहीही ठोस माहिती समोर आलेली नव्हती. ऑरी कोण आहे आणि तो काय करतो हा प्रश्न अनेकदा सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. आता खुद्द ओरीनेच याचा खुलासा केला आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ऑरीने अनेक बाबी स्पष्ट केल्या आहेत. तो म्हणतो, 'लोकांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून मी त्यांना 'आनंद' देतो. मी आनंदाचा संदेश घेऊन येतो. ही गोष्ट मला लोकांशी जोडण्यात मदत करते व हे कार्यक्रमच माझ्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत देखील आहेत.' ऑरीने पुढे दावा केला की, 'अशा कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी त्याला 15 ते 30 लाख रुपये मिळतात. तो म्हणतो, 'लोक मला लग्नासाठी बोलावतात आणि ते मला 15-30 लाख रुपयांच्यादरम्यान मानधन देतात. मी एक पाहुणा म्हणून नाही तर, एक मित्र म्हणून लग्नाला उपस्थित राहावे असे त्यांना वाटते. अशा कार्यक्रमांना पोहोचून मी त्यांना आनंद देतो.' याआधी ऑरी बिग बॉस 17 मध्ये दिसला जेव्हा त्याने सलमान खानला सांगितले की फक्त फोटोसाठी पोज देण्यासाठी सुमारे 20 ते 30 लाख रुपये मिळतात. (हेही वाचा: Madhubala Biopic: ‘मधुबाला’ हा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, जसमीत के रीन करणार चित्रपटाचे दिग्दर्शन)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement