OMG 2 Banned? अक्षय कुमारच्या चित्रपटाचे प्रदर्शन सेन्सॉर बोर्डाने रोखले; प्रमाणपत्र देण्यास नकार- Reports
या चित्रपटामध्ये अक्षय कुमार भगवान शंकर आणि पंकज त्रिपाठी परम शिवभक्ताच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाचा टीझर पाहून लक्षात येते की, मागच्या भागाप्रमाणे यावेळीही देव आणि माणूस यांच्या नात्याभोवती एक रंजक कथा विणण्यात आली आहे,
अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी स्टारर चित्रपट OMG 2 चा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर खळबळ माजली असून, त्यात एक दृश्य दाखवण्यात आले आहे. ज्यामध्ये भगवान शिवाला रेल्वेच्या पाण्याने अभिषेक केला जात असल्याचे दिसत आहे. या सीनबद्दल यूजर्स संतापले आहेत. आता सेन्सॉर बोर्डाने चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. सध्या हा चित्रपट रिव्ह्यू कमिटीकडे पाठवण्यात आला आहे.
या चित्रपटामध्ये अक्षय कुमार भगवान शंकर आणि पंकज त्रिपाठी परम शिवभक्ताच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाचा टीझर पाहून लक्षात येते की, मागच्या भागाप्रमाणे यावेळीही देव आणि माणूस यांच्या नात्याभोवती एक रंजक कथा विणण्यात आली आहे, जे पाहून काही लोक सोशल मीडियावर त्याचे कौतुक करत होते, तर काहींनी शिवाच्या अभिषेकाच्या दृश्यांवर आक्षेप घेतला आहे. या दृश्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्याचे लोकांचे म्हणणे आहे. (हेही वाचा: Salman Khan On Jawan: शाहरुख खानच्या 'जवान'चा प्रिव्ह्यू व्हिडिओ पाहून सलमान खानही झाला अवाक! सांगितली 'ही' गोष्ट)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)