Nitin Desai Funeral: नितीन देसाई यांच्या अंत्यसंस्काराला आमिर खान, आशुतोष गोवारीकर मुकेश ऋषी आणि इतर सेलिब्रिटींनी लावली हजेरी, See Photos
नितीन देसाई यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान आमिर खान, आशुतोष गोवारीकर मुकेश ऋषी आणि इतर सेलिब्रिटींनी हजेरी लावली. नितीन देसाई बुधवारी सकाळी एनडी स्टुडिओमध्ये मृतावस्थेत आढळले होते.
Nitin Desai Funeral: राष्ट्रीय पुरस्कार विजेते कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या पार्थिवावर आज कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळी मुंबईतील जेजे रुग्णालयात देसाईंना अंत्यदर्शन घेतले. नितीन देसाई यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान आमिर खान, आशुतोष गोवारीकर मुकेश ऋषी आणि इतर सेलिब्रिटींनी हजेरी लावली. नितीन देसाई बुधवारी सकाळी एनडी स्टुडिओमध्ये मृतावस्थेत आढळले. कर्जबाजारीपणामुळे त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. ते 57 वर्षांचे होते. (हेही वाचा - Nitin Desai Death Case: नितीन देसाई यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवली होती सुसाईड नोट; ND स्टुडिओमध्ये अंत्यसंस्कार करण्याची व्यक्त केली होती इच्छा)
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 04, 2023 04:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

