Mumbai: कोरिओग्राफर रेमो डिसूझाचा मेहुणा Jason Watkins ची आत्महत्या; राहत्या घरात आढळला मृतदेह

इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझा याचा 48 वर्षीय मेहुणा जेसन वॅटकिन्स हा त्याच्या घरात मृतावस्थेत आढळून आला आहे

Remo D'Souza | (Picture Credit: Facebook)

बॉलिवूडमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझा याचा 48 वर्षीय मेहुणा जेसन वॅटकिन्स हा त्याच्या घरात मृतावस्थेत आढळून आला आहे. जेसनने आत्महत्या केली आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कुपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. जेसननेदेखील चित्रपटसृष्टीत काम केले आहे. तो रेमोला चित्रपटांमध्ये असिस्ट करत असे. आपल्या भावाच्या निधनाने दु:खी झालेल्या रेमोची पत्नी लिझेल डिसूझाने तिच्या भावाचे फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत. तिने लिहिले आहे की, 'का? तू माझ्याशी असे का केलेस. यासाठी मी तुला कधीही माफ करणार नाही'.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement