मल्याळम अभिनेता इनोसंट यांचे 75 व्या वर्षी निधन

इनोसंट गेल्या पाच दशकांपासून मल्याळम सिनेसृष्टीत काम करत होते. या काळात त्यांनी 700 हून अधिक चित्रपट केले.

Innocent

मल्याळम अभिनेते (Malayalam Actor) आणि माजी खासदार इनोसंट (Innocent) यांचे निधन झाले आहे. त्यांचं वय 75 वर्षे होतं. श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे इनोसंट यांना 3 मार्च रोजी कोची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या शरीरातील अनेक अवयवांनी काम करणे बंद केले होते. त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. इनोसंट गेल्या पाच दशकांपासून मल्याळम सिनेसृष्टीत काम करत होते. या काळात त्यांनी 700 हून अधिक चित्रपट केले. त्यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला गेला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement