Menopause कार्यक्रमात Lara Dutta ने महिलांच्या प्रायव्हेट पार्टबद्दल मांडले आपले मत; ऐकून नक्कीच बदलतील तुमचे विचार (Watch Video)

नुकतेच एका रजोनिवृत्तीबाबतच्या एका कार्यक्रमात लारा दत्ताने महिलांच्या प्रायव्हेट पार्टसबद्दल आपले मत मांडले. ही गोष्ट दाबून ठेवण्यासारखी गोष्ट नसून त्याबाबत उघडपणे बोलणे गरजेचे असल्याचे लारा दत्ता म्हणाली.

लारा दत्ता (Photo Credits: Instagram)

महिलांचे प्रायव्हेट पार्टस, मासिक पाळी, रजोनिवृत्ती या सर्व गोष्टी कोणत्याही महिलेच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाच्या बाबी आहेत. त्यांचे महत्व सर्वांनाच माहिती आहे मात्र त्याबद्दल फारसे बोलले जात नाही. अजूनही हे विषय सार्वजनिकदृष्ट्या चर्चिले जात नाहीत. याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक सेलेब्जनी पुढाकार घेतला आहे व आता त्यामध्ये अभिनेत्री लारा लारा दत्ताचे नाव जोडले गेले आहे. नुकतेच एका रजोनिवृत्तीबाबतच्या एका कार्यक्रमात लारा दत्ताने महिलांच्या प्रायव्हेट पार्टसबद्दल आपले मत मांडले. ही गोष्ट दाबून ठेवण्यासारखी गोष्ट नसून त्याबाबत उघडपणे बोलणे गरजेचे असल्याचे लारा दत्ता म्हणाली. सध्या हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून, तो पाहून काही लोकांची तरी मानसिकता नक्कीच बदलू शकते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lara Dutta (@laraduttafc)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now