‘Indian 2’ OTT Release Date: कमल हसन यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट इंडियन 2 'या' दिवशी नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित

कमल हसन आणि शंकर यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट इंडियन २ लवकरच ओटीटीवर झळकणार आहे. या अॅक्शन चित्रपटाला थिएटरमध्ये रिलीज होऊन एक महिना झाला आहे.

Indian 2 PC INSTA

‘Indian 2’ OTT Release Date: कमल हसन आणि शंकर यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट इंडियन २ लवकरच ओटीटीवर झळकणार आहे. या अॅक्शन चित्रपटाला थिएटरमध्ये रिलीज होऊन एक महिना झाला आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांना घर बसल्या पाहता येणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.  हा चित्रपट तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये उपलब्ध असेल. चित्रपटात कमल हसन यांनी भ्रष्टाचाराविरुध्द लढा देणाऱ्या वृध्द स्वातंत्र्य सैनिक कमांडरची भूमिका साकरली आहे. चित्रपटात सिद्धार्थ, रकुल प्रीत सिंग, एसजे सूर्या आणि प्रिया भवानी शंकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. आता OTT प्लॅटफॉर्मवरील हा चित्रपट प्रेक्षकांना कितपत आवडतो हे पाहायचे आहे. (हेही वाचा-'द यूपी फाइल्स' सिनेमाने एकाच आठवड्यात जमावला 16 कोटींचा गल्ला)

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now