Junior Mehmood Dies At 67: कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, ज्येष्ठ अभिनेते ज्युनियर मेहमूदच याचं निधन

कर्करोगाशी झुंज देत असलेले ज्येष्ठ अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचे काल रात्री निधन झाले.

Junior Mehmood

Junior Mehmood Dies At 67: मागील दोन आठवड्यांपासून कर्करोगाशी झुंज देत असलेले ज्येष्ठ अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचे काल रात्री निधन झाले. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ज्युनियक मेहमूद यांनी पाच दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या कारकिर्दीत 250 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन आठवड्यांपूर्वी ते स्टेज 4 कॅन्सरशी लढा देत असल्याचे उघड झाले दरम्यान काल रात्री त्यांची प्रकृती आणखी बिघडली. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांचे मित्र जितेंद्र आणि सचिन पिळगावकर त्यांच्या भेटीला देखील आले होते. त्यांच्या निधनांची माहिती कळताच, बॉलिवुडमध्ये शोककळा पसरली आहे. ज्युनिअर मेहमूद यांचे मित्र सलाम काजी यांनी ज्युनिअर मेहमूद यांच्या निधनाची माहिती दिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement