Jolly LLB 3 In Legal Trouble: अक्षय कुमारचा 'जॉली एलएलबी 3' अडकला कायदेशीर कचाट्यात; चित्रपटाविरुद्ध वकिलाने दाखल केली तक्रार

अजमेर शहर आणि आजूबाजूच्या गावात या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. आता या चित्रपटाबाबत अजमेर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रभान सिंह राठोड यांच्या वतीने अजमेर दिवाणी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Jolly LLB 3 In Legal Trouble

Jolly LLB 3 In Legal Trouble: बॉलीवूड स्टार अक्षय कुमार आणि अशर्द वारसी यांचा आगामी चित्रपट जॉली एलएलबी 3 कायदेशीर कचाट्यात अडकला आहे. अजमेर शहर आणि आजूबाजूच्या गावात या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. आता या चित्रपटाबाबत अजमेर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रभान सिंह राठोड यांच्या वतीने अजमेर दिवाणी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीद्वारे त्यांनी चित्रपटावर वकील आणि न्यायाधीशांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप केला आहे. जॉली एलएलबी भाग 3 या हिंदी चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यासाठी याचिका दाखल केली आहे.

हा दावा सोमवारी अभिनेता अक्षय कुमार, अर्शद वारसी आणि सौरभ शुक्ला यांच्यासह इतर पात्रे आणि निर्माता सुभाष कपूर, डीआरएम, राज्य सरकारमार्फत जिल्हाधिकारी आणि सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशन प्रभारी यांच्या विरोधात सादर करण्यात आला. त्यानंतर याप्रकरणी न्यायालयाने 6 जणांच्या नावे नोटीस पाठवली होती, त्यात या सर्वांना मंगळवारी सकाळी 11.30 वाजेपर्यंत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आज कोणतेही कलाकार न्यायालयात हजर न झाल्याने न्यायालयाने सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब केली आणि नोटिशीची दुसरी प्रत अजमेर डीआरएम इमारतीच्या आवारात जिथे चित्रपटाचे शूटिंग होत आहे तिथे चिकटवावी असे निर्देश दिले. चित्रपटातील कलाकार आणि क्रू मेंबर्स सध्या अजमेर आणि पुष्करमध्ये आहेत. (हेही वाचा: Gaurav More on MHJ Show: गौरव मोरेचा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला रामराम, पोस्ट करत दिली माहिती)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now