Jawan Crossed 1000 Crore Mark: शाहरुख खानच्या 'जवान'ची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई; पार केला 1000 कोटींचा टप्पा

शाहरुख हा पहिला बॉलिवूड स्टार आहे ज्यांच्या दोन चित्रपटांनी एका वर्षात बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे.

Shahrukh Jawan Movie PC twitter

शाहरुख खान स्टारर जवानची 18 व्या दिवशीही क्रेझ दिसून आली. आजही चाहत्यांनी हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली होती. अशा प्रकारे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. शाहरुख खान, नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या जवानने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींची कमाई केली आहे. शाहरुख हा पहिला बॉलिवूड स्टार आहे ज्यांच्या दोन चित्रपटांनी एका वर्षात बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे.

रेड चिलीज एंटरटेनमेंटने सोमवारी X (पूर्वीचे ट्विटर) वर जवानच्या यशाची माहिती शेअर केली आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम अभिनीत पठाणने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला आणि सुमारे चार आठवड्यांनंतर 21 फेब्रुवारी रोजी त्याने जगभरात 1000 कोटींचा टप्पा ओलांडला. त्या तुलनेत, जवानने केवळ 18 दिवसांत हा टप्पा ओलांडला. हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित झाला. जवानने तिसर्‍या रविवारी भारतात 14.95 कोटींची कमाई केली, ज्यामुळे त्याचे देशांतर्गत बॉक्स ऑफिस एकूण 560.78 कोटी झाले. (हेही वाचा: Farrey Teaser: सलमान खानची भाची अलिझेह अग्निहोत्रीचे थ्रिलर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement